Saturday, 2 April 2011

एक दोन तीन चार... धोनी ब्रिगेडची पोरं हुशार



लंकेच्या दहन  करून महेंद्रसिंग धोनी नामक हनुमानाने श्री सचिन या आपल्या रामाच्या चरणी क्रिकेट विश्वकप अर्पण केला ..... 

वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेच्या 274 धावांचा पाठलाग करताना सचिन-सेहवागसारखे मोठे खेळाडू झटपट धारातीर्थी पडले. मात्र नवीन पोरांनी कमालच केली. विराट कोहली, युवराजने झुंजार खेळी केली. गौतम गंभीरच्या 97  आणि कर्णधार धोनीच्या नाबाद 91 धावांच्या स्फोटक खेळीने विश्‍वचषकावर हिंदुस्थानचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. 

हिंदुस्थानच्या  वीरांनी लंकेच्या गोलंदाजांची ‘मुरली’ वाजवत दोन दिवस आधीच विजयाचा ‘गुढीपाडवा’ साजरा केला तेव्हा अवघे वानखेेडे आतषबाजीने उजळून गेले. 

28 वर्षांनंतर हिंदुस्थान पुन्हा ‘जगज्जेता’ झाला असून, क्रिकेटची नवी महासत्ता म्हणून हिंदुस्थानचा झेंडा जगभर डौलाने फडकला आहे. या देदीप्यमान विजयाने जगाच्या कानठळ्या बसवणारा प्रचंड जल्लोष हिंदुस्थानात सुरू झाला आहे. ‘एक दोन तीन चार... धोनी ब्रिगेडची पोरं हुशार’ अशा घोषणा देत देशाच्या कानाकोपर्‍यात प्रचंड विजयी मिरवणुका निघाल्या.



  




















No comments:

Post a Comment

Beautiful Quotes of Life

Play With Dog